डाक अधिक्षक पी.बी. सेलूकर यांना पुरस्कार

भुसावळ प्रतिनिधी । डाक विभागाने लॉकडाऊनच्या काळात पोस्ट ऑफिस आपल्या दारी ही योजना राबवून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांची सोय केली. भुसावळ डाक विभागाची ही कामगिरी राज्यात अव्वल ठरली असून या साऱ्या उल्लेखनीय कार्याबाबत भुसावळ चे डाक अधीक्षक पी. बी.सेलूकर यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

भुसावळ डाकघर विभाग सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असून वैद्यकीय सामुग्रीची पार्सले, जनधन योजना, गरीब कल्याण योजनेच्या लाभार्थ्यांचे आर्थिक सहाय्य, सामान्य नागरिकांचे इतर बॅक खात्यातील पैसे AePS च्या माध्यमातून संस्था तसेच लोकांपर्यंत घरपोच करुन कोरोना संसर्ग रोखण्याच्या कामास सहाय्यभूत होण्याची कामगिरी चालविली आहे. घरपोच पैसे दिल्यामुळे बँकामध्ये पैसे काढण्यासाठी होणारी गर्दी व त्यामुळे होऊ शकणारा कोरोनाचा प्रादुर्भाव याला अटकाव होण्यास पोष्टाची भूमीकाही मोलाची आहे. या व्यतिरिक्त आजपर्यंत वैद्यकीय सामुग्रीचे स्पीड पोस्ट व पार्सलव्दारे बुकींग व वितरण देखील डाक विभाग देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवित आहे. 

सर्व ग्रामीण डाक सेवक, पोस्टमन व इतर कर्मचारी सामाजिक भावणेतून मोठ्या उमेदीने लोकांपर्यंत पोहचून हा लाभ देण्याचा  प्रयत्न करीत आहेत. लॉकडाऊनमध्येही जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक व पोस्टमन आपल्या जीवाची पर्वा न करता जिल्ह्यातील गोरगरीब जनतेसाठी राबत आहेत.

Protected Content