भुसावळात तीन रेल्वे गेट बंद केल्याने रहिवासी संतप्त (व्हिडीओ)

bhusaval relway gate

भुसावळ, प्रतिनिधी | येथील झेड.टी.एस. कडे जाणाऱ्या मार्गावरील तिन्ही रेल्वे गेट रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. शहरातून झेड.टी.एस.कडे जाणारा हा एकमेव मार्ग असल्याने रेल्वे प्रशासनाने हा मार्ग अचानकपणे बंद केल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

 

या तिन्ही गेटवर रेल्वेने सुरक्षा बलाचे कर्मचारी व अधिकारी तैनात केले आहेत. त्यामुळे सायंकाळपर्यंत तिन्ही रेल्वे गेट उघडे करा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

शहरामधून झेड.टी.एस.कडे जाणारा हा मार्ग पूर्वी मुक्ताईनगरकडे जाणारा जुना राष्ट्रीय क्रमांक सहा होता. रेल्वे आयुध निर्माणी व मिल्ट्री सेंटर परिसरातून हा मार्ग जातो. त्यावर रेल्वे बायपासचे तीन रेल्वे गेट आहेत तसेच झेड.टी.एस.परिसरामध्ये रेल्वेचे झोनल कार्यालय असून संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयही आहे. रेल्वे कर्मचारी व विद्यार्थ्यांची या रोडवर नेहमी वर्दळ असते. परिसरातील नागरिकांची लहान मुले याच रस्त्याने शाळेसाठी शहरात येतात, त्यामुळे अत्यंत सोयीचा असलेला हा मार्ग रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

 

 

Protected Content