यावल नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी अभिमन्यु चौधरी बिनविरोध

यावल प्रतिनिधी । येथील नगरपरिषदच्या उपनगराध्यक्षपदी अभिमन्यु चौधरी यांची आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

दरम्यान यावल नगर परिषदच्या उपनगराध्यक्षा देवयानी महाजन यांनी अंतर्गत ठरलेल्या विषयानुसार त्यांनी आपल्यापदाचा राजीनामा दिला होता. या अनुषंगाने रिक्त झालेल्या पदावर नुतन उपनगराध्यक्ष यांच्या निवडीसाठी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या आदेशावरून आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष नौशाद तडवी यांच्या उपस्थित घेण्यात आलेल्या ऑनलाईन बैठकीत नगरसेवक अभीमन्यु (हेन्द्री ) चौधरी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या बैठकीत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील, माजी प्रभारी नगराध्यक्ष व नगरसेवक राकेश कोलते, माजी उपनगराध्यक्ष व नगर सेवक प्रा. मुकेश येवले, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक शेख असलम शेख नबी, नगरसेवक समीर शेख मोमीन, नगरसेवक मनोहर सोनवणे, नगरसेविका रेखा चौधरी,  देवयानी महाजन, शिला सोनवणे, नगरसेवक दिपक बेहडे, सैय्यद युनुस सैय्यद युसुफ यांच्यासह एकुण १८ नगरसेवक यांनी या ऑनलाईन सभेत सहभाग नोंदविला.

दरम्यान या संपुर्ण उपनगराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत नगर परिषदचे कार्यालयीन अधिक्षक योगेश मदने, स्वच्छता निरिक्षक दिलीप गायकवाड , स्वप्नील म्हस्के यांच्यासह आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.

Protected Content