अंगणवाड्यांचे काम निकृष्ट; भीम आर्मीची तक्रार

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात व वस्तीतील चिमुकल्यांमध्ये शालेय शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने महिला व बालकल्याण विभागांतर्गत विविध ठिकाणी लाखो रुपये खर्चून अंगणवाड्यांचे काम सुरू आहे. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार भीम आर्मीतर्फे गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

या संदर्भात भिमआर्मी सविधान रक्षक दल या संघटनेचे राज्य सचिव सुपडु संदानशिव यांनी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड (बोरसे) यांना दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील चुंचाळे, शिरसाड, वढोदे , किनगाव बु॥ , फैजपुर , सांगवी बु॥ , आदीवासी क्षेत्रातील मानापुरी, खालकोट , जामुनझिरा, पांढरीवस्ती, हिंगोणे या ठिकाणी जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत २०२१ते २०२२ या कालावधीतील शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतुन अंगणवाड्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले. यातील काही कामे ही अंतीम टप्प्यात आली असुन काही कामे ही प्रगतीपथावर आहेत. यावेळी भिमआर्मी संविधान रक्षक दल या समाजसेवी संघटने या होत असलेल्या कामांच्या गुणवत्ते बद्दल प्रश्न उपस्थित केले करून म्हटले आहे की ही सर्व अंगणवाड्यांचे बांधकाम अत्यंत निकृष्ठ प्रतिची करण्यात येत असून , या सर्व कामांवर पंचायत समितीच्या बांधकाम अभियंत्यांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याचे आरोप लावले आहे. या अंगणवाड्यांमध्ये गोरगरीबांच्या लहान चिमुकल्या मुलांना शिक्षण देण्यात येणार आहे.

प्रसंगी अशा प्रकारच्या निकृष्ठ बांधकाम करून अंगणवाडयांचे बांधकाम केल्यास भविष्यात यातील अंगणवाडी कोसळल्यास अप्रिय घटना होवुन यात जिवीत हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तात्काळ या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात आल्याशिवाय संबंधीत ठेकेदारांची बिले काढण्यात येवु नये, अशी मागणी केली आहे. या तक्रारींची दखल घेत गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड (बोरसे) यांनी सदरच्या अंगणवाड्यांचे काम निकृष्ठ प्रतिचे होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल असे लिखित आश्वासन आंदोलनकर्त भिमआर्मी संविधान रक्षक दलाचे प्रदेश सचिव सुपडु संदांशीव व संघटनेचे इतर पदाधिकारी यांनी दिले आहे.

या आंदोलनामध्ये भिमआर्मी संविधान रक्षक दलाचे प्रदेश अध्यक्ष रमाकांत तायडे, जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वानखेडे, विक्रम प्रधान, तालुका अध्यक्ष सचिन वानखेडे, डॉली वानखेडे, विनोद भालेराव, गौरव सोनवणे, शिवाजीराव गजरे, विनोद सोनवणे आदींचा समावेश आहे.

 

Protected Content