रावेर महसूलची जानेवारी अखेर फक्त ३९ टक्केच वसूली

रावेर प्रतिनिधी । मागील वर्षी शंभर टक्के वसूली करणारे रावेर महसूल विभागाची यावर्षी मात्र जानेवारी पर्यंत फक्त  ३९ टक्केच वसूली झाली आहे. तर यंदा देखील शंभर टक्के शासनाचा महसूल वसूल केला जाणार असल्याचा ठाम आत्मविश्वास रावेर तहसिलदार संजय तायडे यांना आहे 

मागील वर्षी रावेर महसूल विभागाने शंभर टक्के वसूल केली होती त्यावेळी जिल्हाभरात रावेर महसूल विभागाचे कौतुक देखिल झाले होते.परंतु पूला खालून बरेच पाणी वाहुन गेले असून वर्षभर कोरोना व्हायरस या महामारी विरुध्द लढतांना शासनाची तिजोरीत ठण-ठण झाली आहे. यंदा शंभर टक्के पेक्षा अधिक वसूली करण्याची गरज आहे. रावेर महसूल विभागाला दिलेले उद्दीष्ट पूर्ण करून शासनाला सहकार्य करण्याची अत्यंत गरज आहे.अद्याप जानेवारी उलटला तो पर्यंत रावेर महसूल विभागाची ३९ टक्केच वसूली झाली आहे.

Protected Content