एनसीसी बटालियनच्या छात्र सैनिकांकडून १०० किलोमीटरची सायकलिंग यशस्वीरित्या पुर्ण

जळगाव प्रतिनिधी ।  एनसीसी बटालियनच्या वतीने छात्र सैनिकांनी आज ३० जानेवारी रोजी फिट इंडिया आणि पाणी वाचवा मोहिमेंतर्गत प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जळगाव ते अमळनेर पर्यंतचा १०० किलोमिटरची सायकलिंग करून जनजागृती करण्यात आली.

काव्यरत्नावली चौकापासून ३० जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता छात्र सैनिकांच्या सायकलिंगला सुरूवात करण्यात आली. सायकलिंग रॅलीला समादेशक अधिकारी कर्नल प्रविण धिमन यांचे मागदर्शन लाभले.  दरम्यान मूळजी जेठा महाविद्यालयाच्या छात्र सैनिकांनी अमळनेर येथील बस स्थानकावर पाणी वाचवा या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण करून जनजागृती केली.  ३५ छात्र सैनिकांनी ४९ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअनच्या समादेशक अधिकारी कार्यालयास भेट दिली. यावेळी कर्नल विवेक भटारा यांनी स्वागत केले. १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअनचे समादेशक अधिकारी कर्नल प्रविण धिमान यांनी स्वतः सायकल चालवून या मोहिमेचे नेतृत्व केले. तसेच सुभेदार मेजर कोमल सिंग, लेफ्टनंट  डॉ. गौतम भालेराव, लेफ्टनंट डॉ. योगेश बोरसे, लेफ्टनंट शिवराज पाटील यांनी देखील या मोहिमेत सायकल चालून छात्र सैनिकाना फिट इंडिया मोहिमेस प्रेरणा दिली. मोहीम यशस्वितेसाठी हवालदार नारायण पाटील आणि हवालदार अनिल, डॉ. कांचन कुलकर्णी यांनी मोहीम यसस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

Protected Content