वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेसाठी खा. उन्मेष पाटील यांची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जगभरातल्या देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी महत्त्वाची असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषद करीता या वर्षी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेषदादा पाटील यांची निवड करण्यात आली असून ते आज दावोस कडे रवाना झाले आहेत.

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमीक फोरमची परिषद १५ जानेवारीपासून पाच दिवस आयोजीत करण्यात आली आहे. आहे. या परिषदेत भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजेरी लावणार असून ते १७ जानेवारीला संध्याकाळी चार ते साडे चार वाजण्याच्या दरम्यान संबोधन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त या परिषदेला जगभरातील इतर नेतेही उपस्थिती लावणार आहेत. या वर्षीच्या परिषदेचा विषय हा ’जागतिक परिस्थिती’ असा आहे.भारतासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची आहे.

दरम्यान, या पाच दिवसीय परिषदेसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेषदादा पाटील यांची निवड करण्यात आली असून ते दावोसला रवाना झाले आहेत. पाच दिवस चालणार्‍या या बैठकीत व्यापार, राजकारण, कला, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील बड्या व्यक्ती सहभाग घेतात. खासदार उन्मेषदादा पाटील राज्यातील युवा अभ्यासू खासदार म्हणून ओळखले जातात. यामुळे त्यांची या महत्वाच्या परिषदेसाठी निवड झाली असून त्यांच्यासोबत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व खासदार हेमंत पाटील हे देखील या परिषदेसाठी सहभागी होणार आहे. उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातून एकमेव खासदार उन्मेशदादा पाटील हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत सहभागी होणार असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

दावोस हे स्वित्झर्लंडमधील लँड वासर नदीच्या काठावर वसलेलं सुंदर खेडं आहे. हे गाव स्विस आल्प्स पर्वताच्या प्लेसूर आणि अल्बुला या पर्वतरागांनी वेढलेलं आहे. या गावाची लोकसंख्या केवळ अकरा हजार इतकी आहे. युरोपमधील सर्वात उंचीवर वसलेलं हे ठिकाण आहे. दावोसमध्ये दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात येते. या बैठकीसाठी जगभरातील बडे नेते आणि उद्योगपती आपली उपस्थिती लावतात. दरवर्षी या बैठकीत जवळपास २५०० व्यक्ती सहभाग घेतात.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना १९७१ साली करण्यात आली होती. या संस्थेचं मुख्यालय स्वित्झर्लंडची राजधानी जीनेव्हामध्ये आहे. या संस्थेच्या माध्यमातून जागतिक व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्ती एकत्र येतात आणि जागतिक विकासाला चालना देण्यासंबंधी धोरण निश्चित करतात. पाच दिवस चालणार्‍या या बैठकीत व्यापार, राजकारण, कला, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील बड्या व्यक्ती सहभाग घेतात.

Protected Content

%d bloggers like this: