पहूर येथे पोलिसावर हल्ला : आरोपी पसार !

पहूर, ता. जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गाडी साईडला लावा असे पोलिसांनी सांगताच सध्या फत्तेपूर आऊट पोस्ट येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांच्यावर येथील अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. यात पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे गंभीर जखमी झाले आहेत.

शनिवारी रात्री साडेनऊ ते दहा च्या सुमारास पहूर बस स्थानक परिसरात फत्तेपुर आऊट पोस्ट येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांनी एका व्यक्तीस रस्त्याच्या साईडला गाडी लाव असे सांगितले. यावर अज्ञात व्यक्तीने व्यक्तीने पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांना बेदम मारहाण केली. यात अनिल सुरवाडे गंभीर जखमी झाले. त्यांना पहूर ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करण्यासाठी आणण्यात आले त्यांच्यावर डॉक्टर अमोल पाटील यांनी प्रथमोपचार करून त्यांना जळगाव येथील मेडिकल कॉलेज येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यात पोलीस कॉन्स्टेबल अनिल सुरवाडे यांच्या डोक्यात मार लागला असून एक हात फॅक्चर झाला आहे तसेच त्यांच्या सोबत असलेले वाहन चालक रवींद्र मोरे यांनाही धमकावण्यात आले आहे असे समजते.

दरम्यान, अज्ञात व्यक्तीने खाकी वर्दीतील पोलिसावर केलेल्या या हल्ल्यामुळे पोलीसच असुरक्षित असून सर्वसामान्य जनतेचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान पहूर येथे तणावपूर्ण शांतता असून आरोपी मात्र पसार झाला आहे. आरोपीचा पोलीस कसून तपास करीत आहे दरम्यान सर्वसामान्य जनता जनता झाली आहे. पोलिसावर हल्ला करणार्‍या आरोपीच्या तपास लावून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: