चोरट्यांची देवस्थानांवर वक्रदृष्टी : शाकंबरी माता मंदीरातून लांबविली दानपेटी !

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील हिंगोणे खु. गावातील शाकंबरी माता मंदीरातील दानपेटीतील रोकडसह २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने लंपास केल्याची घटना आज उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील हिंगोणे खु. गावात शाकंबरी माता मंदिर आहे. या मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञाताने दानपेटीतील २ लाख रुपये रोकडसह ४५ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे.

तत्पूर्वी पाटणादेवी येथील चंडीका देवी मंदिराची घटना ताजी असताना आज ही घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे चोरट्यांनी आता मंदिराला लक्ष केल्याची चर्चा समाज माध्यमात सुरू आहेत. या घटनेप्रकरणी ज्ञानेश्वर मोहन चव्हाण (पोलिस पाटील) रा. हिंगोणे खु. यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

Protected Content