Home क्राईम शिरसोली येथे तलवार घेऊन दहशत माजवणार्‍या तरूणाला अटक

शिरसोली येथे तलवार घेऊन दहशत माजवणार्‍या तरूणाला अटक


जळगाव प्रतिनिधी ।  तालुक्यातील शिरसोली गावात हनुमान मंदिराजवळ हातात तलवार घेऊन दहशत माजविणार्‍या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

साहिल रज्जाक पिंजारी  वय १९ रा. चिंचपुरा चौक शिरसोली  असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.  त्याच्याकडून ४ हजार रुपये किमतीची तलवार जप्त करण्यात आली. 

सविस्तर माहिती अशी की, शिरसोली गावात हनुमान मंदिराजवळ साहिल पिंजारी हा  बुधवारी दुपारी  हातात तलवार घेऊन गावात दहशत माजवित असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक प्रमोद लाडवंजारी यांच्यासह पथकाने  शिरसोलीतुन  साहिल पिंजारी यास अटक केली. त्याच्याकडून ४ हजार रुपये किंमतीची २९ इंच लांब व २३ इंच रुंदीची तलवार जप्त केली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक प्रमोद लाडवंजारी यांच्या फिर्यादीवरून साहिल पिंजारी याच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड हे करीत आहेत

 

 


Protected Content

Play sound