बूथ सक्षमीकरण अभियानात भाजप पदाधिकारी सहभागी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय बूथ सक्षमीकरण अभियानात आज येथील भाजपचे पदाधिकारी आणि नेते सहभागी झाले.

आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बूथ सशक्तीकरण अभियानाची बैठक संपन्न झाली. ही बैठक राष्ट्रव्यापी पातळीवर आयोजीत करण्यात आली असून यात ठिकठिकाणचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्हर्च्युअल या प्रकारात सहभागी झाले होते. यात श्री. नड्डा यांनी आगामी निवडणुकांसाठी सर्वांनी सज्ज राहण्याचे आवाहन करत पक्षाच्या प्रचार-प्रसारासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.

या बैठकीला भुसावळातून पक्षाचे नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले. यात रावेर लोकसभा क्षेत्रातील खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे, बेट बचाओ-भेटी पढाओचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, नंदू महाजन,पद्माकर महाजन, सुरेश धनके, प्रल्हाद पाटील, जयपाल बोदडे, नवल पाटील, हर्षल पाटील आदी पदाधिकारी या बैठकीला व्हर्चुअली उपस्थित होते.

Protected Content