भुसावळाच्या हायटेक आयटीआयला राज्य शासनाचा पुरस्कार प्रदान

purskar

भुसावळ प्रतिनिधी । नाशिक येथे राज्य शासनाच्या कौशल्य विकास उद्योजकता विभागामार्फत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात विविध उपक्रमात सहभाग घेऊन नाविन्यपूर्ण उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील आदर्श हायटेक आयटीआयला उत्कृष्ट आयटीआय म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

आयटीआयने कौशल्य विकास व उद्योजकता विभागातर्फे वेळो-वेळी आयोजित केलेल्या उपक्रमात सहभाग घेऊन जळगाव जिल्ह्यात तंत्र प्रदर्शनात प्रथम पुरस्कार मिळविला तर नाशिक विभागात तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळविला असुन वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. पुरस्कार आदर्श हायटेक आय.टी.आयचे निदेशक तुषार धांडे, के.जि.राणे, चेतन वंजारी, मंगेश नरवाडे, मनोज वारके, योगेश कोलते, आकाश राखोंडे, भगवान हिवाळे व प्रशिक्षणार्थी नितीन बारी, रुषिकेश पाटील, तडवी, बाविस्कर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या टीमला आर.बी.महाजन यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या पुरस्कार सोहळ्यात एस.आर.सुर्यवंशी, सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिक, एच.एल कंपनीचे जनरल मॅनेजर डॉ.एस.पी सिंग, ऋषभ इंडस्ट्रीजचे गोंदिया संचालक मानकर प्रा.एम.के.पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष कैलास महाजन, सचिव शिवाजी पाटील, संचालक प्राजक्त पाटील यांनी पुरस्कार विजेत्या टीमचे अभिनंदन केले आहे.

Protected Content