जळगाव प्रतिनिधी । ओरीअन इंग्लिश मिडीयम स्कुलचे इयत्ता 9 व 10 वीच्या विद्यार्थ्यांना गाडेगाव येथे दि. 24 जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रमांसाठी ट्रकमध्ये कोंबून नेले होते. यासंदर्भात युवासेनेने आज दि. 25 जुलै रोजी शाळेचे मुख्याध्यापक संदिप साठे यांना निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, काल दि. २४ जुलै रोजी गाडेगाव येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला विद्यालयातील विद्यार्थ्यांना नेण्यात आले होते. मात्र या विद्यार्थ्यांना नेण्यासाठी मालवाहतुक गाडीचा उपयोग केला गेला असून या सर्व प्रकार अमानवीय आहे. तसेच विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अत्यंत निंदनीय आहे. या कार्यक्रमाला मुलांना ज्या पद्धतीने नेण्यात आल्यामुळे हे अत्यंत चुकीची आहे. काही गैरप्रकार घडला असता तर त्यास जबाबदार कोण राहीले असते ?
सुदैवाने कोणताही प्रकार घडला नाही. पण हे पूर्णपणे बे-जाबाबदार व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. झालेल्या प्रकरणाबद्दल युवा सेना जाहीर निषेध व्यक्त करत असा प्रकार पुन्हा होणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. मुख्याध्यापकांनी अशी चुक यापुढे होणार नाही अशी युवासेनेला ग्वाही दिली.
निवेदन देतांना युवासेना जळगाव जिल्हा सरचिटणीस राहुल पोतदार, युवासेना जिल्हा समन्वयक जितेंद्र बारी, सामाजिक कार्यकर्ते अभय शिंदे, विधानसभा क्षेत्र प्रमुख मिलिंद शेटे, महानगर युवा अधिकारी स्वप्निल परदेशी, शहर समन्वयक निलेश सपकाळे, संकेत कापसे, युवासेना कॉलेज कक्ष विद्यापीठ संपर्क अधिकारी अंकीत कासार व युवासैनिक उपस्थित होते.