एमपीएससी राज्यसेवा परिक्षेत दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांचे यश

जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९चा सुधारित अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून यात जळगावच्या दर्जी फाऊंडेशनचे २७ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९चा सुधारित अंतिम निकाल जाहिर झाला. त्यात जळगावच्या दर्जी फाऊंडेशनचे २७ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यात दर्जी फाउंडेशनचे प्रसन्नजित चव्हाण (इतर मागास प्रवर्गात तिसरे) व वसिमा शेख (महिला खुले प्रवर्गात दुसरी) असे दोन विद्यार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून यशस्वी झाले आहेत.

यासोबत, रेखा वाणी, प्राची कर्णे व विपुल पाटील यांची पोलिस उपअधिक्षकपदी निवड झाली. तहसिलदारपदी शुभम बहकर, प्रशांत पाटील, अक्षय ढाकणे, रूणय जुक्कलवार, मोहनिश शेलवटकर यांची तर उपमुख्यकार्यकारी किंवा गटविकास अधिकारी गट-अ या पदासाठी प्रदीप शेंडगे, अजिंक्य सुर्यवंशी व राम फरकांडे, नायब तहसिलदारपदी महेश देशमुख, नीखिल पाटील, संदीप हडगे, अमोल नरूटे, दत्ता बोरसे, पुनम देवगुणे, नितीन हरड, महेश अनारसे, अनिल पाटील व ऋतुजा पारखे यंची तर महाराष्ट्र फायनान्स ऑडिट अँड अकाऊंट गट अ पदासाठी विक्रांत जाधव यांची निवड झाली. दोन विद्यार्थी सायली चिखलीकर व राहुल ठोंबरे यांची एपीओपदी निवड झाली. तर शुभम घुगे यांची कक्षाधिकारी म्हणून निवड झाली. यशवंतांचे प्रा. गोपाल दर्जी, दर्जी फाऊंंडेशनच्या संचालिका ज्योती दर्जी यांनी कौतुक केले आहे.

Protected Content