भोरगाव लेवा पंचायततर्फे भाजपचा निषेध (व्हिडीओ)

ramesh patil lewa samaj भुसावळ प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना पहिल्या यादीत डावलणार्‍या भारतीय जनता पक्षाचा आज भोरगाव लेवा पंचायततर्फे निषेध करण्यात आला.

एकनाथराव खडसे यांना पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. यामुळे कालच खडसे समर्थकांनी आपला रोष व्यक्त केला असून अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. तर याच पार्श्‍वभूमिवर, आज भोरगाव लेवा पंचायतीचे कुुटुंबप्रमुख रमेशदादा विठू पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. हॉटेल मल्हारमध्ये आयोजित या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले. नाथाभाऊंनी भाजपच्या वाढीसाठी अथक प्रयत्न केले असून समाजानेही या पक्षाला आजवर साथ दिली आहे. मात्र आता भाजपने तिकिटांच्या पहिल्या यादीत स्थान न देऊन नाथाभाऊंचा आणि पर्यायाने समाजाचा अपमान केला असल्याचे रमेशदादा पाटील म्हणाले. त्यांनी याप्रसंगी भाजपचा तीव्र शब्दात निषेध केला.

Protected Content