धरणगाव प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या सर्वांगिन विकासाचा ध्यास घेवून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले चंद्रशेखर अत्तरदे यांचा भोलाने यांचा झंझावाती प्रचार दौरा झाला. गावातील महिलांनी जागोजागी चंद्रशेखर अत्तरदे व जि.प. सदस्या माधुरीताई अत्तरदे यांचे औक्षण करून फुलहार घालून स्वागत केले. यावेळी गावातील नागरिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रॅलीत गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचे दिसून आले.
प्रचार दौऱ्यात यांनी घेतला सहभाग
यावेळी भाजपा जळगाव तालुकाध्यक्ष संजय भोळे, मनोज चौधरी, दिलीप महाजन, दीपक चौधरी, गावातिल सरपंच, ग्रा.पं. सदस्य, प्रमुख पदाधिकारी, ममुराबाद-आसोदा गटातील शक्ति प्रमुख नाना कोळी, सचिन चौधरी, कल्पेश, बूथ प्रमुख सुनील पाटील, प्रवीण सोनवणे, मनोज सवदे, खगेश नेहेते, प्रतिसाद चिरमाडे, सागर चव्हाण, उमेश महाजन, तुषार भोळे, जीवन सोनवणे, मनीष चौधरी, सदाशिव कोळी, गणेश वानखेडे तसेच गटातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.