कापूस बियाणे विक्री २० मे पासूनच सुरू करा : भडगावात निवेदन

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य शासनाच्या कृषी विभागाने १ जून ऐवजी २० मे पासूनच बियाणे विक्री सुरू करावी अशी मागणी करण्यात आली असून या संदर्भात येथे निवेदन देण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाकडुन महाराष्ट्रात १ जुन पासून कपाशी बियाणे विक्री करण्याचे आदेश कुषी विभागाकडुन कृषि विक्रेत्यांना देण्यात आले आहेत. यासंदर्भात भडगाव तालुका सिडस,पेस्टीसाईड, फटिलाझर अशोशियन व कुषी विक्रेते यांची भडगाव येथे बैठक घेण्यात आली. यात महाराष्ट्र राज्यात व विशेषतः जळगाव जिल्ह्यात २० मे पासून कपाशी बियाणे विक्री संदर्भात परवानगी देण्यात यावी यासंदर्भात चर्चा करुन भडगाव तालुका सिड्स पेस्टीसाईड फर्टीलायझर्स असोशिसनच्या वतीने आज भडगाव तालुका कुषी अधिकारी बी.बी. गोर्डे तसेच पंचायत समिती कृषि अधिकारी ईश्वर देशमुख यांना त्या मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यांमध्ये विहिरींना पाणी पातळी चांगली आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात काही भागात पाणी पातळी चांगली असल्याने भडगाव तालुक्या सह इतर तालुक्यातील कपाशी ही ठिबक सिंचनाद्वारे लागवड शेतकरी वर्ग करत असतो. त्यामुळे ज्या शेतकरी वर्गाजवळ पाण्याची सोय आहे तो शेतकरी वर्ग हे २० मे पासूनच लागवड करण्याची घाई करतात. त्यामुळे जर आपल्या जळगाव जिल्ह्यात किंवा महाराष्ट्र राज्यात जर बियाणे हे २० मे नंतर जर मिळत नसल्याने जळगाव जिल्ह्यातील बरेच शेतकरी वर्ग हे आपल्या जिल्ह्यातील शेजारच्या राज्यातून कपाशी बियाणे विकत घेऊन लागवड करतात. त्यामुळे त्यांची जास्त भावाने बियाणे घेऊन शेतकरी वर्गाची फसवणुक होतं असते. तसेच अनाधिकृत विक्रेत्यांकडून शेतकरी वर्ग बोगस बियाणे खरेदी करतात. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मागील वर्षी कपाशी उशिरा सुरू झाल्यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांनी बाहेरून बियाणे आणले. त्यात काही शेतकर्‍यांची फसवणुक झाली होती. यामुळे शासनाने १ जून या तारखे ऐवजी २० मे या तारखेपासुन कपाशी बियाणे विक्री करण्यास परवानगी आम्हाला देण्यात यावी असे निवेदन देण्यात आले

यावेळी भडगाव तालुका अध्यक्ष दिपक पाटील; स्वामी समर्थ कृषी केंद्र बोदर्डे, उपाध्यक्ष मनोज पाटील गजानन अँग्रो एजन्सीज भडगाव; सल्लागार प्रकाश राठोड गजेंद्र कृषी केद्र भडगाव यांच्यासहे श्री कृष्णा अँग्रो एजन्सीज, साई कृषी केंद्र, साईराम कृषी केंद्र, गिरणाई अँग्रो सर्हीसेस ,हरी ओम कृषी केंद्र ,प्रेरणा शिवनेरी ऍग्रो एजन्सी, न्यु त्रीमुर्ती अँग्रो एजन्सीज, न्यू नूतन कृषी केंद्र आमडदे ,धनश्री कृषी केंद्र,गणेश फर्ट्रीलायझर्स पळासखेडे,गजानन फर्ट्रीलायझर्स गोंडगाव ,गणराज कृषि केंद्र पिपरखेड , श्री गणेश कृषी केंद्र बोदर्डे , यांच्या सह तालुक्यातील व शहरातील कृषी विक्रेते उपस्थित होते.

या संदर्भात भडगाव तालुका अध्यक्ष सीड्स पेस्टिसाइड रासायनिक खते असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटील म्हणाले की, शासनाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण यांनी विक्री व पुरवठा बाबत ज्या अटी घातलेल्या आहेत या अटींमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी व किरकोळ विक्रेते यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते कारण अनधिकृत विक्रेते बियाणे विक्री करत असतात. व परराज्यातून बियाणे महाराष्ट्रात दाखल होते त्यामुळे शासनाने या गोष्टींचा विचार करून विक्रीचे परवानगी ही २० मे पासून द्यावी ही आमची मागणी आहे.

Protected Content