दहिगावच्या ‘त्या’ आरोपींना जामीन : मात्र तूर्तास गावबंदी !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव येथील फलक विटंबना प्रकरणातील संशयित आरोपींना आज न्यायालयाने जामीन दिला असला तरी दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना गावबंदी करण्यात आली आहे.

तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील थोर पुरुषाच्या प्रतिमा विटंबना प्रकरणातील सहा संगीत आरोपींना सोमवारी येथील न्यायालयात उपस्थित केले होते. यात न्यायालयाने आरोपींची जामीनावर मुक्तता करत न्यायालयात आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना गावात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान गावात सोमवारी शांतता असून पोलीस बंदोबस्त कायम आहे.

तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील थोर पुरुषाच्या प्रतिमेची शनिवारी रात्री विटंबना केली होती. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकाश माळी, भूषण पाटील, वैभव पाटील, रितेश पाटील, योगेश माळी आणि रुपेश चौधरी या सहा संशयीता विरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपींना पोलीसांनी अटक केले होते. सोमवारी संशयित आरोपींना येथील न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एम. एस. बनचरे यांनी सहाही आरोपींना जामीनावर मुक्त केले. मात्र पोलीसाकडून जो पर्यंत आरोपपत्र दाखल होत नाही तो पर्यंत त्याना गावात प्रवेश करण्यास न्यायालयाने मनाई हुकूम केला आहे.

दरम्यान, सोमवारी सकाळी सकाळपासून गावातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाली असून यावल दहिगाव ते सावखेडा बस सेवा सुरू झाली आहे. गावात पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर व सहकारी यांनी चोख बंदोबस्त राखला आहे.

Protected Content