‘मविआ’च्या यादीनंतर महायुतीच्या पॅनलचे उमेदवार जाहीर !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाविकास आघाडीने बाजार समितीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर एक तासांच्या आत भाजप-शिवसेना पुरस्कृत लोकमान्य पॅनलने देखील आपली यादी जाहीर केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्यासाठी अजून मुदत बाकी असली तरी घडामोडी गतीमान झाल्या आहेत. या अनुषंगाने आज महाविकास आघाडीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यात राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या सदस्यांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीची यादी जाहीर झाल्यानंतर एक तासांच्या आत भाजपनेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून (सर्वसाधारण)-

१ प्रल्हाद पंडित पाटील : मोरगाव
२ गोंडू रामदास महाजन : रसलपूर
३ दिलीप चुडामण पाटील : उटखेडा
४ गोपाळ लक्ष्मण नेमाडे : चिनावल
५ राहूल गोपाळ महाजन : वाघोदा
६ चेतन श्रावण पाटील : उटखेडा
७ संजय जीवराम महाजन : चोरवड

इतर मागास वर्ग (ओबीसी)

१ दुर्गादास बाबूराव पाटील : निंभोरा बुद्रुक

महिला राखीव

१ सौ. कल्पना उत्तमराव पाटील : खिरवड
२ सौ. सविता दिनेश ( छोटू) पाटील : रेंभोटा

भटके-विमुक्त राखीव

१ प्रवीण सुपडू पासपोहे : मुंजलवाडी

ग्रामपंचायत मतदारसंघ ( सर्वसाधारण )

१ महेंद्र कडू पाटील : नेहेते
२ नितीन रामलाल भोगे : मस्कावद

आर्थिक दुर्बल घटक

१ सुनील दामोदर पाटील : विवरे

अनुसूचित जाती-जमाती ( एस.सी. ) राखीव

१ सिकंदर समशेर तडवी : मोरव्हाल

व्यापारी मतदारसंघ

१ रितेश संतोष पाटील : सावदा
२ शेख लुकमान शेख निसार : रसलपूर

हमाल-मापाडी मतदारसंघ

वसंत मधुकर येवले : कोचूर

अशा प्रकारे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. हे उमेदवार भाजप तालुकाध्यक्ष राजन लासूरकर आणि शिवसेना तालुकाध्यक्ष दिनेश उर्फ छोटू पाटील यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आले आहेत.

Protected Content