अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान; पंचनामे करण्याच्या सुचना

pik nuksan

भडगाव(प्रतिनिधी)। मंगळवारी दुपारी तालुक्यातील बोदर्डे, निंभोरा, पिचर्डे, कनाशी, कोठली, बात्सर, लोण पिराचे या गावात झालेल्या वादळी पावसामुळे केळी, पपई व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बात्सर, पाढंरद, पिचर्डेसह परिसरात अवकाळी पाऊसाने मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने आज सकाळी पाचोरा प्रांत अधिकारी राजेंद्र कचरे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करून लगेच तलाठी, कुषीसहाय्यक, ग्रामसेवक यांना तातडीने लगेच पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.

अवकाळी पावसामुळे तालुक्यातील गावामध्ये झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत. यावेळी भडगाव तहसिलदार गणेश मरकड, तालुका कुषी अधिकारी गोर्डे सर्व कुषी विभागाचे कर्मचारी तसेच महसुल विभागाचे सर्व कर्मचारी सोबत होते तसेच भडगाव पं.स.सभापती रामकुष्ण पाटील, बात्सरचे संजय पाटील यांच्या सह पिचर्डे येथील संरपच,उपसंरपच,पो.पाटील,बात्सरचे संरपच,उपसंरपच, पोलीस पाटील, पाढंरदचे संरपच, उपसंरपच या गावांचे ग्रामस्थ, शेतकरी बांधव व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. तसेच ज्या गावातील घरांचे नुकसान झाले आहे त्या गावातील घरांचे ग्रामसेवक यांनी लगेच गावातील घरांचे पंचनामे करण्यात सुरूवात केली आहे. पिचर्डे येथील जिजामाता विघालयाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. शाळेची पाहणी करून लगेच पंचनामा करण्यात आला तसेच शेतात जाऊन तलाठीसह कर्मचारी पंचनामा करण्यात सुरूवात केली आहे.

Protected Content