जागृत मरीमाता देवस्थान येथे महाप्रसाद कार्यक्रमाची सांगता

बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागृत मरीमाता देवस्थान एज्युकेशनल कल्चरल ट्रस्ट बोदवड जिल्हा जळगावच्या वतीने संस्थापक व पुजारी देविदास राखोंडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापूर रोडवरील जागृत मरीमाता देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे महाप्रसाद कार्यक्रमाची सांगता मोठ्या उत्साहात झाली.

सदर कार्यक्रमात बोदवड शहरातील तसेच इतर ग्रामीण भागातील रहिवाशांनी महाप्रसादाचा लाभ घेतला शंभर वर्षापासून चालत आलेल्या या परंपरेचा वारसा जे एम डी शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट चालवत आहे, दरवर्षी या कार्यक्रमात उळदाचीडाळ व भाकरी असा प्रसाद देवीला चढविला जातो व नंतर अन्नदान केले जाते. त्याचप्रमाणे संस्थेचे संस्थापक पुजारी देविदास राखोंडे गुरुजी अध्यक्ष निवृत्ती राखोंडे,उपाध्यक्ष संतोष तेली व सभासद विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करीत असतात यावर्षी 75 आजादी का अमृत महोत्सव निमित्त संस्थेने विनाशुल्क विद्यार्थ्यांकरिता चित्रकलेचे आयोजन संस्थेच्या सभासद आंतरराष्ट्रीय चित्रकार स्वाती यशोदास राखोंडे यांनी आयोजित करून राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचे पंधरा मिनिटात पोट्रेट काढून सर्वांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे व सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी संस्थेने आयोजित केलेल्या चित्रकले स्पर्धेबद्दल आभार मानले व कौतुक केले.

Protected Content