कोरपावली येथे सरपंच व उपसरपंच यांनी स्वखर्चाने दुरुस्त केली कूपनलिका(व्हिडिओ )

 

यावल, प्रतिनिधी । संपुर्ण जगासह महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्गाचा पुनश्च दुसऱ्या टप्याची सुरुवात झाली असुन, ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन कोरपावली गावाचे सरपंच विलास अडकमोल यांनी केले आहे. तसेच अनेक वर्षांपासून बंद असलेली कूपनलिका दुरुस्त करून लोकार्पण केले. 

कोरोना विषाणु संसर्गाच्या संकटकाळात ग्रामस्थांना भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासु नये हा सामाजिक व विधायक दृष्टीकोणातुन तालुक्यातील कोरपावली येथील सरपंच यांच्या पुढाकाराने व उपसरपंचांनी पदरमोड करून गावातील नागरीकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्नसोडवण्यासाठी कुपनलिका सुरू केली.  आगामी उन्हाळ्यात गावात टंचाई जाणवू नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. कोरपावली येथील उपसरपंच हमिदाबी पिरन पटेल व त्यांचे चिरंजीव  मुख्तार पिरण पटेल यानी स्वः खर्चाने उन्हाळ्यात गावात टंचाई भासू नये म्हणून कुपनलिका सुरू केली. गावात असलेल्या  जुन्या कुपनलिकेतील पंप हा नादुरूस्त होता, त्यामुळे त्यांनी पदरमोड करत नवीन सबमर्सिबल पंपसेट, केबल, पीव्हीसी पाईप, तसेच आवश्यक सर्व ईलेक्ट्रीकल साहित्य आणून कूपनलिका सुरू केली. या कुपनलिकेचा परिसरदेखील स्वच्छ करण्यात  आला आहे. त्याच प्रमाणे गावातील गटारी, सांडपाण्याचा प्रश्न सोडवून स्वच्छता अभियान राबवले जात आहे. या कूपनलिकेचे संपूर्ण काम पूर्ण झाले असून, सरपंच विलास अडकमोल यांच्याहस्ते कुपनलिका सुरू  करून लोकार्पण करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक प्रविण सपकाळे व ग्रामपंचायत सदस्य सत्तार तडवी, आरिफ  तडवी, हफशान तडवी, हुरमत तडवी, माजी सरपंच जलील पटेल, संदीप नेहेते, सादिक 

पटेल, उमेश जावळे, इमरान पटेल, इसाक पटेल, जावेद पटेल आदी उपस्थित होते. सरपंच विलास अडकमोल यांनी येणाऱ्या २०२१ ते २०२२च्या येणाऱ्या वर्षात कोरपावली गावाच्या विविध विकास कामांचा त्यांनी नियोजन केले आहे. यात चोपडा विधान सभा क्षेत्राच्या आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या विकास निधीतुन ५० लाख रुपयांची निधी देण्याची घोषणा केली असल्याचे सरपंच विलास अडकमोल यांनी सांगीतले.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/507667503953759

Protected Content