भुसावळात करोनामुळे बसस्थानक, रेल्वेस्थानक पडले ओस

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळात करोनामुळे सर्वत्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रत्येकजण सहजा बाहेरगावी प्रवास करणे टाळत आहे. त्यामुळे शहरातील रेल्वेस्थानक आणि बसस्थानक देखील ओस पडल्याचे दिसून येत आहे.

रेल्वेचे जंक्शन असलेल्या भुसावळ स्थानकावर कोरोनाचा प्रभाव जाणवत असून भुसावळ रेल्वेस्टेशन सध्या ओस पडले असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्याभरात रेल्वेच्या तिकीटांची देखील विक्री मंदावली आहे. गेल्या आठवडाभरात तब्बल 900 च्या वर आरक्षित तिकिटे रद्द करण्यात आली असून यातून साडेपाच लाखांचा परतावा प्रवाशांना करावा लागला आहे.

कोरोनामुळे शाळांना मिळालेल्या सक्तीच्या सुट्यांमुळे शहरातील लहान मुले सुखावली दिसत आहे तर पालक मात्र संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. परीक्षांमुळे मार्च महिना खरेतर विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने तणाव देणारा असतो. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक दिले होते. त्यानुसार मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षेला सुरुवात होणार होते होणार होते मात्र त्यांचा शासनाच्या निर्णयामुळे परीक्षा होणार की, परीक्षा होणार की नाही किंवा पुढे ढकलण्यात याबाबत याबाबत सगळीच अनिश्चितता आहे. सीबीएसई बोर्डाच्या काही शाळांमध्ये शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपले असून त्यांना सुट्ट्या लागल्या तर काही शाळांच्या परीक्षा संपत आल्याचा एक दोन विषयांचे पेपर बाकी आहे. त्यामुळे उरलेले पेपर कधी होणार होणार याबाबत पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे तर शहरातील महाविद्यालयांमध्ये सुट्या जाहीर करण्यात आल्या असून असून तेव्हा परीक्षेकरता महाविद्यालय सुरू आहे.

Protected Content