जळगावात भीम महोत्सवाचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने अप्पासाहेब विश्‍वासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

क्रांतिसूर्य जोतिबा फुले यांच्या जयंतीदिनी अर्थात ११ एप्रिलपासून भीम महोत्सव सुरू होणार आहे. यानिमित्त सायंकाळी ६.३० वाजता महात्मा गांधी उद्यानात परिवर्तनवादी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता खुल्या भीम गीतगायन स्पर्धा बालगंधर्व खुले नाट्यगृहात होणार आहेत. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षिसे ही सगुणाबाई कोसोदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणार आहेत. १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी शालेय गटासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. ही बक्षिसे पंडित सदाशिव सपकाळे, कलावती भगवान नन्नवरे व द. भी. तायडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येतील. तसेच महाविद्यालयीन गटाकरिता प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस रामदास नगराळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणार आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातच क्ले मॉडेलिंग स्पर्धा सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी सहभागाकरिता दीपक जोशी, सलमान शहा, शरद भालेराव, हरिश्‍चंद्र सोनवणे यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन भालेराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र भालेराव, सिद्धार्थ लोखंडे, विजय कोसोदे यांनी केले आहे.

Add Comment

Protected Content