आदिवासी युवकाच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्याची मागणी

mayat

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कासारखेडा येथील सालदार मृत्यु प्रकरणी संयशीतांची तात्काळ चौकशी करून हत्या चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आदीवासी ग्राम समिती व्दारे पोलीस निरीक्षक यावल यांना देण्यात आलेल्या लेखी निवेदनात करण्यात आली आहे.

 

आपल्या निवेदनात आदीवासी ग्राम समितीने म्हटले आहे की कासारखेडा तालुका यावल येथील राहणारे संभाजी पाटील यांच्याकडे मागील एक वर्षा पासुन मांगीलाल रामु भिल क्य २८ वर्ष हा सालदार म्हणुन कामास होता. दिनांक ९ मार्च १९ रोजी दुपारी तीनच्या सुमारास संभाजी पाटील यांनी किनगाव येथील यास्मीन पटेल हिच्या घरी जावुन तिच्या घराच्या चारही बाजुस वळांग करून दे असे सांगीतले. त्या अनुसार मांगीलाल भिल याने किनगावला जावुन सांगीतल्या प्रमाणे काम करू लागला. काही वेळेनंतर दोन माणसे मोटर सायकलवर मांगीलाल यास कासारखेडा घेवुन गेले. त्यास संभाजी पाटील यांच्या खळयात घेवुन जातांना मांगीलालचे मामा दिलीप भिल यांनी त्या दोघ मोटरसायकलस्वारांना विचारणा केली असता आम्ही यास दवाखान्यात उपचारा करिता घेवुन जात असल्याचे असल्याचे सांगीतले. परन्तु त्यांनी मांगीलाल भिल यास उपचारास न घेवुन जाता संभाजी पाटील यांच्या खळयात मांगीलाल याच्या पत्नी रेखाबाई मांगीलाल भिल या महीलेसमोर त्याला टाकून दिले. मांगीलाल यांच्या डोक्याच्या मागील बाजूने रक्ताची धार लागली असल्याचे त्यांच्या पत्नीला दिसले. यामुळे मांगीलाल भील यांचा खून झाला असल्याचे स्पष्ट होत आहे. या सर्व घटनेची निष्पःक्षपणे सखोल चौकशी करून यातील गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आदीवासी ग्राम समितीद्वारे सुधाकर सुकलाल भिल यांनी केली आहे. यात न्याय न दिल्यास आम्ही आदीवासी एकता परिषद भारत, या संघटनेच्या माध्यमातुन तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारादेखील देण्यात आला आहे.

Add Comment

Protected Content