मराठा सेवा संघाच्या विभागीय कार्याध्यक्षपदी डॉ. हेमंत येवले यांची निवड

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा सेवा संघाच्या विभागीय कार्यकारणी निवडीची सभा सोमवारी जळगाव येथील निवृत्ती नगरातील मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्यालयात नासीक विभागीय उपाध्यक्ष शिवश्री सुरेंद्र पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विभाग निहाय कामाचा आढावा घेत जुनी कार्यकारणी बरखास्त करत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.  यात यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड या उपविभागासाठी कार्याध्यक्ष म्हणून यावल येथील डॉ. हेमंत जयवंतराव येवले तर सहसचिव म्हणून स्वयंदीप प्रतिष्ठान चे संचालक संदीप निंबाजी सोनवणे पाटील तर  उपाध्यक्ष  म्हणून दहिगाव  येथील बी. डी .पाटील,  यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

बैठकीच्या सुरुवातीस मा जिजाऊंच्या प्रतिमेस विभागीय उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील, जिल्हा कार्यकारणीचे सुरेश लक्ष्मण पाटील ,राम पवार , चन्द्रशेखर भदाणे,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष लीना पवार यांच्या वतीने जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करत जिजाऊ वंदन करण्यात आले , याप्रसंगी विभागीय उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील यांनी  तालुका समितीकडून आढावा घेतला. तर त्यानंतर जिल्हा कार्यकारिणीचे सुरेश लक्ष्मण पाटील यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी सेवा संघाचे कामास गती मिळावी यासाठी जळगाव जिल्ह्याचे   तालुक्याचे पाच विभाग करण्यात आले यात १)यावल रावेर मुक्ताईनगर बोदवड , २)जळगाव ,भुसावळ जामनेर, ३) चाळीसगाव भडगाव पाचोरा पारोळा ४)एरंडोल, धरणगाव अमळनेर, चोपडा ५) जळगाव महानगर असे पाच विभाग करण्यात आले. या विभागणीय निवडीची सभा आयोजित करण्यात आली होती.

यात यावल रावेर मुक्ताईनगर बोदवड या विभागासाठी तालुक्यातून कार्याध्यक्ष म्हणून,डॉ.हेमंत येवले सहसचिव म्हणून स्वयमदीप प्रतिष्ठानचे संचालक संदीप निंबाजी सोनवणे उपाध्यक्ष बी डी पाटील यांची निवड करण्यात आली आहे.  या बैठकीस जिल्ह्यातील सर्व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी सदस्यासह यावल येथून तालुकाध्यक्ष अजय पाटील , डी.बी.पाटील,संभाजी ब्रिगेड चे विजय रमेश पाटील सुनील दशरथ गावडे पाटील , संभाजी ब्रिगेडचे अनिल पाटील उपस्थित होते. नूतन नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, वसंत  पाटील, देविदास  पाटील, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण समिती सभापती रवींद्र उर्फ छोटू पाटील, सुरेश पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत पाटील, चिंचोली विद्यालयाचे चेअरमन अनिल  साठे, किनगाव येथील मनीष  कुमार, पाटील  पाटील, महेंद्र पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

Protected Content