बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा- अमोल रिंढे पाटील

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील सर्वात मोठे पिक सोयाबीन आहे. साडेसात लक्ष हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ३ लाख ८० हजार हेक्टरच्या आसपास सोयाबीन पेरा यंदाआहे. सुरुवातीला पिक बरे होते मात्र अवेळी पिक पिवळे पडुन उत्पादनात मोठी घट येण्याची चिन्हे आहेत.त्यामुळे बुलढाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करावी अशी मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी निवेदनातून केले आहे.

सध्या सोयाबीनचा हंगाम सुरु आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी सोंगणी आणि मळणी एकाच वेळी केल्याने सरासरी उत्पन्नाचा अंदाज येवू लागला आहे. बुलढाणा जिल्ह्यात पावसाचे दिवस साधारणत: ४६ मानले जातात. मात्र यंदा केवळ ३९ दिवसच पावसाळा राहिल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पावसाळ्याचे दिवस कमी व त्यात पावसाचे प्रमाणही कमी याचा थेट परिणाम पिकांवर झाला आहे. त्यात यलो मोझॅक मुळे अवेळीच पिक पिवळे पडून कमी दिवसात वाळले. यातुन उत्पन्नात मोठी घट येत आहे. याचा सर्वे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसगट मदतीचा हात देणे गरजेचे आहे.  शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. सोयाबीन कापसाचा खर्चही निघत नाही. अशावेळी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहीले पाहिजे. आगामी काळात राज्यातील सत्ताधार्यांना शेतकरी रोषाला सामोरे जावे लागेल.

दुष्काळ जाहिर करा –

परतीचा पाऊस आला असता तर किमान जल पातळी वाढली असती. यंदा पावसाचे प्रमाण खुपच कमी आहे. जलसाठे अर्धे – अधिक कोरडे ठण आहे. याचे नियोजन आतापासुन करावे व जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य स्थिती असल्याने दुष्काळ जाहिर करणे आवश्यक आहे.  अशी प्रतिक्रीया  मनसेचे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी दिली.

Protected Content