आदिशक्ती मुक्ताईचा जन्मोत्सव सोहळा; नवरात्रोत्वात विविध कार्यक्रम

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  आदिशक्ती संत मुक्ताबाई संस्थानतर्फे मुक्ताईचा ७४४ वा जन्मोत्सव  कोथळी येथील मूळ समाधी मंदिरात स्वामी समर्थ परिवार व मुक्ताई संस्थेतर्फे चंडीपाठ व मुक्ताई विजय ग्रंथ पारायणाने उत्साहात साजरा करण्यात आला.

आदिशक्ती संत मुक्ताबाई नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शके १२०९ अश्विन शुक्ल प्रतिपदेला अवतीर्ण झाल्या. संत मुक्ताई आदिशक्तीचा अवतार असून, आदिशक्ती मुक्ताबाईचा जन्मोत्सव दिन घटस्थापनेच्या दिवशी  आहे. मुक्ताईनगर येथील मुळ समाधी मंदिरात पहाटे चार वाजता संस्थांचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्याहस्ते महाअभिषेक होऊन आरती करण्यात आले रवींद्र पाटील यांच्याहस्ते घटस्थापना होईल. त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण समाधान महाराज गावंडे यांनी केले. तसेच दररोज

दुपारी ३ ते ५ वाजेच्या दरम्यान मुक्ताई चरित्र, संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान हरिपाठ असा ९ दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमात मुक्ताई संस्थानची व्यवस्थापक हरणे महाराज, उद्धव महाराज, पुरुषोत्तम वंजारी, संस्थानचे अध्यक्ष रवींद्र पाटील, स्वामी समर्थ केंद्र परिवार, पंकज महाराज, रतिराम महाराज, विशाल महाराज यांचा सहभाग होणार आहे. या निमित्त घराघरात चंडीपाठ व मुक्ताईचे पारायण करण्याचे आवाहन मुक्ताई संस्थानचे रवींद्र हरणे महाराज यांनी केले आहे.

Protected Content