जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची मोर नदी पुनर्जीवन कामास भेट

WhatsApp Image 2019 05 04 at 10.06.38 PM

यावल (प्रतिनिधी )तालुक्यातील हिंगोणा येथील मोर नदिचे पुर्नजिवनाचे सुरू असलेल्या कामावर जलसंधारण मंत्री गिरीष महाजन यांनी शनिवारी सांयकाळी भेट दिली.

 

हे काम आमदार हरीभाऊ जावळे यांच्या थेंब अमृताचा या संकल्पनेतून लोकसहभागातून सुरू आहे.कामकाजाचे पाहणीनंतर महाजन यांनी समाधान व्यक्त करत सर्व पक्षीयाचे व नागरीकांचे आभार व्यक्त करत अशा कामांची गरज असल्याचे त्यांनी सांगीतले. आमदार हरीभाउ जावळे व सर्व पक्षीय, तसेच फैजपुरचे महामंडलेश्श्वर प’.पु. जनार्दन महाराज यांच्या प्रयत्नातून लोकसहभागातून तालुक्यातील नद्या-नाले यांचे पुर्नजिवीताचे कामे सुरू आहेत. यात तालुक्यातील १२ नद्या-नाल्यांचा समावेष असल्याचे गीरीष महाजन यांनी सांगून नद्या-नाले खोल होणार असल्याने रावेर-यावल तालुक्यातील खोल जात असलेल्या जलपातळी उंचावण्यास निच्छीतच मदत होईल असे सांगीतले.तालुक्यातील हिंगोणा येथील मोर धा्रण परीसरात मोर नदिचे पुर्नजिवीताचे सुरू असलेल्या कामाची त्यांनी पाहणी केली. प्रसंगी त्यांनी शेळगाव बॅरेज चे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगीतले. प्रसंगी आमदार हरीभाउ जावळे, जनार्दन महाराज व यांचेसह नागरीक उपस्थीत होते.

Add Comment

Protected Content