महागाई विरोधात मुक्ताईनगर काँग्रेस आक्रमक

मुक्ताईनगर, प्रतिनिधी । केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढ व महागाई विरोधात मुक्ताईनगर तालुका कॉंग्रेस कमिटीतर्फे परिवर्तन चौक ते पर्यंत तहसीलपर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. 

 

इंधनाचे दर वाढल्यामुळे केंद्रातील मोदी सरकारच्या मागील सात वर्षाच्या काळात महागाईने लोकांचे जगणे कठीण केले आहे. दिवसेंदिवस प्रत्येक वस्तू महाग होत आहेत. अलीकडच्या काळात पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाक गॅस घेणे सर्वसामान्य माणसाला परवडत नाही तरीही मोदी सरकारने कोणता ही दिलासा जनतेला दिलेला नाही. उलटपक्षी कररूपाने सर्वसामान्य जनतेला लुटले जात आहे  याच्या निषेध  मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे परिवर्तन चौक ते पर्यंत तहसील पर्यंत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर कमी असताना मोदी सरकारने इंधन व गॅस यांचे दर आवाक्याबाहेर केले.  एकीकडे लोकांच्या हाताला काम नाही दुसरीकडे वाढणारी महागाई अशा अडचणीत देशातील जनता भरकटली जात आहे.  मुक्ताईनगर येथील तहसीलदारांना काँग्रेसतर्फे निवेदन देऊन मुक्ताईनगर काँग्रेसतर्फे इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला.  याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील, मागासवर्गीय जिल्हा उपाध्यक्ष बी.डी. गवई, जिल्हा हा सचिव संजय पाटील, प्रा. सुभाष पाटील,अरविंद गोसावी दिनेश पाटील, शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे, विधानसभा अध्यक्ष नीरज बोराखेडे, राजू जाधव, राहुल पाटील, निखिल चौधरी, संजय चौधरी, सोनू चव्हाण गोपाल जाधव वनिल चव्हाण, निलेश भालेराव, दादाराव पाटील, अमोल पाटील, बाळासाहेब पाटील, रामराव पाटील, निलेश पाटील, अनिल पाटील, ईश्वर पाटील, अनिल सोनवणे, आनंदा तायडे, मनोज तायडे, विक्रम जाधव, प्रशांत पाटील, महिला तालुका अध्यक्ष सुमन पाटील, सोपान धनगर, सुनिता गवळी, अरिफ रब्बानी, रोहित भालेराव, पुंजाजी इंगळे, राजू पवार, गणेश महाजन, संजय चव्हाण, करतार पवार, किसन पवार, विजय चव्हाण, शिवाजी पाटील, पुंजाजी इंगळे, राजू वानखेडे, दिनकर भालेराव, रसाल सिंग, सोपान धनगर, अमोल जैन, आनंदा कोळी, शिव शंकर पाटील, संजय चव्हाण. आदी कार्यकर्ते उपस्थित होते

 

Protected Content