रस्त्यांच्या मागणीसाठी मनसेने काढले ‘जागर यात्रा’

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रस्त्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी सकाळी शिवकॉलनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जळगाव जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले. शहरातील रस्त्यांसह इतर कामांना तात्काळ गती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील आकाशवाणी चौक, इच्छादेव चौक आणि अजिंठा चौकात याठिकाणी प्रस्तावित उड्डाणपुल मंजूर झालेले असतांना सुध्दा उड्डाण पुल होत नाही. यामुळे महामार्गावर निष्पाप नागरीकांचा अपघातात बळी जात आहे. याबाबत मनसेने वेळोवळी निदर्शने, आंदोलन, मोर्चा आणि उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतू प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाप्रशासन, महापालिका प्रशासन, आमदार, खासदारांसह तिन मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जळगाव शहरात जागर यात्रेला सुरूवात केली आहे. यात शिव कॉलनी ते अजिंठा चौफुली उड्डाण पुल तातडीने तयार करावेत, जळगाव शहरातील रस्त्यांची दुरूस्ती करावी आणि पाळधी ते तरसोद वळण रस्ता झाला पाहिजे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.  कार्यक्रमात यमराजाच्या वेषभूषेने नागरीकांचे लक्ष वेधले होते.  याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष जमिल देशपांडे, महानगराध्यक्ष आशिष सपकाळे, जिल्हा समन्यवयक राजेंद्र निकम यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content