जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे.[स्वायत्त] कॉलेज) जळगाव येथे वाणिज्य मंडळाद्वारे विद्यार्थांसाठी द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इन इंडिया, जळगाव यांच्या सहकार्याने सी.ए. कन्हैया मंधान यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे सी.ए.कन्हैया मंधान यांना उपप्राचार्य प्रा. श्रीमती.के.जी.सपकाळे यांच्या भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी आणि व्याख्याते सी.ए.कन्हैया मंधान यांनी सी.ए. परीक्षेची तयारी कशी करावी, त्याचे किती टप्पे असतात, किती पेपर असतात, त्यांची तयारी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती देऊन ठरवले तर तुम्ही वयाच्या विसाव्या वर्षी सी.ए. होऊ शकाल असे प्रतिपादन केले.
याचबरोबर त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर महाविद्यालयीन जीवनात वाणिज्य शाखेत सी.ए.ला किती महत्त्व आहे हे पटवून देत विद्यार्थ्यांच्या शंकांना समर्पक उत्तरे देत त्यांना CA क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देत शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या सोबत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट इन इंडिया, जळगाव येथील विनोद जाधव हे देखील उपस्थित होते.
याप्रसंगी वाणिज्य शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.करुणा सपकाळे, पर्यवेक्षक प्रा. आर.बी.ठाकरे व विज्ञान व कला विद्या शाखांचे समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे, प्रा.उमेश पाटील व वाणिज्य मंडळ अध्यक्षा प्रा.गौरी अत्तरदे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. ललिथा ईलांको, तर आभारप्रदर्शन प्रा. निवेदिता जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.अतुल इंगळे, प्रा.जयंत इंगळे प्रा. प्रविण महाजन, प्रा.स्वप्नील धांडे, प्रा.पूजा सायखेडे, प्रा.ज्योती चौधरी यांनी परिश्रम घेतले.