दिव्यांग व प्रज्ञाचक्षु बांधवांचा आ. भोळे यांना जाहीर पाठींबा

 

WhatsApp Image 2019 10 09 at 8.38.20 PM

जळगाव, प्रतिनिधी | महायुतीचे उमेदवार आ. सुरेश भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शहरातील दिव्यांग व प्रज्ञाचक्षु बांधवाची जी. एम. फाउंडेशन येथे नुकतीच बैठक झाली. या बैठकीला २०० ते २५० दिव्यांग व प्रज्ञाचक्षु बांधव उपस्थित होते.व यांनी आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावावर विश्वास ठेवून जाहीर पाठींबा दिला.

आ. राजूमामा भोळे यांनी दिव्यांग व प्रज्ञाचक्षु बांधवासाठी पाच वर्षात भरपूर असे चांगले काम केले आहे. आम्ही आ. राजुमामा यांचा प्रचार घरोघरी जावून करू व प्रचंड मतांनी निवडून आणू असा संकल्प त्यांनी केला.या बैठकीप्रसंगी आ. सुरेश भोळे यांनी सांगितले की, केंद्र व राज्य सरकारने दिव्यांग व प्रज्ञाचुक्ष बांधवांसाठी विविध योजना आणल्या आहेत. आपण वेळोवेळी पाठपुरावा करून यायोजनांचा फायदा हा दिव्यांग बांधवाना मिळवून दिला आहे व यापुढेही दिव्यांग व प्रज्ञाचक्षू बांधवांसाठीही सदैव सेवा करण्यासाठी तत्पर राहील असे सांगितले. याप्रसंगी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, दीपक सूर्यवंशी, राजेंद्र घुगे पाटील, जितेंद्र पाटील, राजेश खडके, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, दिव्यांग आघाडी अध्यक्ष गणेश पाटील, किशोर निवे, गणेश वाणी जयवंत उज्जैनकर, राजेंद्र वाणी, भटू जोशी, संजय कासार, नंदुलाल पाटील, ज्ञानेश्वर बाविस्कर, राजेंद्र सोनवणे, बाबासाहेब गवळी, प्रवीण पाटील, भूपेश भूपेश जैसवाल, सुनील साळुंखे, निलेश सोनवणे, प्रदीप सोनवणे, भारत जाधव, उपस्थित होते. भेटी प्रसंगी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content