सावखेडा जलशुद्धी केंद्राच्या जागेवर बाग फुलविण्यासाठी मिळणार निधी

जळगाव (प्रतिनिधी) शहरात मेहरूण येथील शिवाजी उद्यानासारखे दुसरे पर्यटन स्थळ विकसीत करण्यासाठी महापालिकेच्या सावखेडा शिवारातील वापरात नसलेले ४ एकर जागेतील जलशुद्धीकेंद्राच्या तेथे पर्यटन स्थळ विकासासाठी पर्यटन मंत्रालयाकडून सकारात्मक कार्यवाही होऊन निधी आचार संहिता शिथिल झाल्यानंतर मिळणार असल्याची माहिती स्थायी सभापती जितेंद्र मराठे यांनी दिली.

 

वाघूर जलशुद्धी केंद्र सुरु झाल्यानंतर सावखेडा येथील संपूर्ण जागा तेथील पंपींग स्टेशनच्या मशिनरीसह वापरात नाही. येथील मशीनरी जुन्या झाल्याने त्यांचा लिलाव करून ती जागा पर्यटनासाठी वापरण्यात येणार आहे. येते वॉटर पार्क, बगीचा तसेच इतर सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असून यासाठी सभापती मराठे यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना पत्र लिहून निधीची मागणी केली होती. महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे वास्तुविशारद नुमनुकीचा विषय प्रस्तावित असून थोड्याच कालावधीमध्ये वास्तुविशारद नेमणूक झाल्यावर ह्या पार्टन विकास योजनेचे आराखडे तयार करण्याचे कामास गती येणार आहे.

Add Comment

Protected Content