जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभातफेरी, पथनाट्य व पोस्टर प्रदर्शन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध समिती तसेच सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या वतीने ‌१ डिसेंबरपासून जिल्ह्यात जागतिक एड्स दिन व सप्ताह राबविला जात आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात शुक्रवारी विविध उपक्रम राबविण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आवारात सकाळी एचआयव्ही एड्सविषयक पथनाट्य , प्रभात फेरी व पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. एड्स विषयक जनजागृती उपक्रमास सर्वसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती‌चे अध्यक्ष आयुष प्रसाद होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. पी. सय्यद, शासकीय वैदकिय महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर, डॉ. धर्मेंद्र पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रभातफेरीस हिरवा झेंडी दाखवून सुरूवात करण्यात आली. प्रभातफेरीमध्ये शहरातील नर्सिंग महाविदयालय, सामान्य रुग्णालय, एच.जे. थीम महाविदयालयातील सुमारे ४०० विदयार्थी-विदयार्थीनी, शिक्षकवृंद, जिल्हा एड्स नियंत्रण विभागातील अधिकारी‌व कर्मचारी उपस्थित होते.

दिशा बहुउददेशीय संस्थेचे विनोद ढगे व त्यांच्या पथकाने एचआयव्ही-एड्स जनजागृतीपूर्वक विनोदी पथनाटय सादर केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थितांना शपथ दिली.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एचआयव्ही प्रतिबंधात्मक चिन्ह फुग्यांसह आकाशात सोडण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी करण्यासाठी गिरीश गडे, श्रीमती शुभांगी पाटील, महोज्जीम खान, रुपाली दिक्षित, उज्वला पगारे, दिपाली पाटील, प्रतिभा चौधरी, सुवर्णा साळुंखे, प्रशांत पाटील, साथी या संस्थेचे प्रमोद बोराखडे, व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी अंतर्गत सामाजिक क्षेत्रातील काम करणा-या संस्था राष्ट्रविकास संस्था, गोदावरी फाउंडेशन, टिसीआय फाउंडेशन, आधार संस्था, अमळनेर / जळगाव, सानेगुरुजी फाउंडेशन, अमळनेर येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालयातंर्गत पारोळा, भुसावळ, धरणगाव, यावल, न्हावी, भडगाव, येथे ग्रामीण रुग्णालयातील आयसीटीसी केंद्राद्वारे माहिती पुस्तिका, पोस्टर्स प्रदर्शन, प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.

Protected Content