तरूणाच्या डोक्यात टाकली फरशी; एकावर गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शिरसोली नाका येथे काही कारण नसतांना एका तरुणाच्या डोक्यात फरशी टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोली सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, श्याम शरद साळुंखे वय-२३, रा. शिरसोली नाका, जळगाव हा तरूण कुटुंबासह वास्तव्याला आहे. बुधवार १३ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजता श्याम साळुंखे हा तरूण त्याच्या घराच्या ओट्यावर बसलेला होता. त्यावेळी संशयित आरोपी श्याम सुभाष तांबे रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हा घरी येऊन श्याम साळुंखे याला शिवीगाळ करत मारहाण केली तसेच बाजूला पडलेली फरशीचा तुकडा डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. दरम्यान जखमी झालेल्या श्याम साळुंखे याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी सकाळी ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी श्याम सुभाष तांबे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील हे करीत आहे.

Protected Content