पारोळा शहरात व तालुक्यात २५ टवाळखोर मुलांवर कारवाई; २५ मोटार सायकली जप्त

पारोळा, प्रतिनिधी ।कोरोना विषाणूंच्या प्रसार होऊ नये यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी भारतात लॉक डाऊन केले असून या लॉकडाऊनमध्ये गर्दी होऊ नये यासाठी केवळ अत्यावश्यक सेवा असणाऱ्यांना बाहेर पडण्यास मुभा दिली आहे. मात्र, काही टवाळखोर मुलं विनाकारण रस्त्यांवर मोटर सायकल फिरवत असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी २५ मुलांवर कारवाई  करून २५ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या.

लॉक डाऊन असतांना सुद्धा टवाळखोर मुलं दिवसभर रस्त्यावर मोटर सायकल घेऊन नॅशनल हायवे नंबर सहावर त्याचप्रमाणे बाजारपेठेत शहरांमध्ये विनाकारण बघ्याची भूमिका घेऊन हिंडत असतात. यासंदर्भात दि. १० रोजी मोटारसायकल गाडी घेऊन रस्त्यावर व संपूर्ण पारोळा तालुक्यात हिंडू नये. असे जाहीर करण्यात आले आहे. तरीसुद्धा टवाळखोर गावभर फिरत असतात म्हणून पारोळा पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे व उपनिरीक्षक दातीर यांनी आपल्या साथीदारांसह स्वतः टू व्हीलरवर फिरणारी टवाळखोर मुलांविरुद्ध व नागरिकांन विरुद्ध दिनांक १० रोजी सायंकाळी सुमारे ७ ते ८ वाजेच्या दरम्यान २५ जणांविरुद्ध भा.द.वि.कलम १८८ प्रमाणे कारवाई करून २५ मोटार सायकल जप्त केल्या आहेत.

Protected Content