वसंतवाडी येथे तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

suicide pro.......

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वसंतवाडी येथील 26 वर्षीय तरूणाने गोठ्यात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, समाधान खंडू अहिरे (वय-26) रा. वसंत वाडी ता.जि.जळगाव हा बॅड वाजविण्याचे काम करतो, तर इतर वेळी मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवारी रात्री जेवण करून गल्लीतील एक पडक्या घरात कोणीही नसतांना दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. घराच्या बाजूला राहत असलेली महिला कचरा टाकण्यासाठी जात असतांना पडक्या गोठ्यात कोणीतर लटकलेले दिसून आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. याबाबत एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी आणि भाऊ असा परीवार आहे.

Protected Content