पहूर येथे अवैध धंदेवाल्यांमध्ये राडा; गुन्हा दाखल

पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । येथे अवैध धंदेवाल्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत पाच जण जखमी झाले असून पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत वृत्त असे की, येथील लेलेनगर भागात पहूर शेंदूर्णी रोडवर पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर गेल्या काही वर्षापासून अवैध व्यवसाय दारू ,सट्टा पत्ता राजरोसपणे सुरू आहे. रविवारी रात्री अवैध धंद्यावरून दोन गटात लाठ्या-काठ्या, लोखंडी पाईप, सोडा वाटरच्या बाटल्यांसह दगडफेक होवून तूफान हाणामारी झाली. यात पाच जण जखमी झाले. सहाय्यक पोलिस निरिक्षक राकेशसिँग परदेशी हे ताबडतोब आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी गर्दीवर नियंत्रणा मिळवित पाच जणांना ताब्यात घेतले. मात्र या हाणामारीत पाच जण जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले होते. परंतु सकाळी परत दोन्ही गट आमने सामने येऊन भांडणाला सुरूवात झाली. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. पोलिसांनी भांडणा बाबत विचारणा केली आसता आमचे सामाईक भिंतीवरून वाद असल्याचे कारण त्यांनी सांगितले.

दरम्यान, संबंधीत आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमवून एकमेकांना लोखंडी राड , लाठ्याकाठ्यांनी मारहाण करणे ,दमदाटी व शिवीगाळ केल्याचे पोलिसांना मिळून आल्याने पो. कॉ. नवल दगडू हटकर यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने नीतीन शिवाजी पांढरे वय ३३, सचीन शिवाजी पांढरे वय २७, महेश शिवाजी पांढरे वय२५, संदीप वसंत मराठे (सर्व रा. लेलेनगर) यांच्यासह विरूध्द गटातील शाम प्रभाकर कुमावात वय ४१, दिपक प्रभाकर कुमावत वय ३०, सतीष प्रभाकर कुमावत वय २८ ,प्रभाकर पांडूरंग कुमावत वय ५१ ,संदीप कुमावत ( सर्व रा. लेलेनगर) यांचेवर भादंवि कलम १६०, १४३,१४७,१४८,१४९,३२४,५०४,५०६, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली असून चार जण अद्याप फरार आहेत.पुढील तपास पोलीस उप निरिक्षक चेडे हे करीत आहेत.

Protected Content