राज्यस्तरीय महिला फुटबॉल स्पर्धेचा उद्या अंतिम सामना

41746298 4a7c 41f7 8972 7e2368b28faf

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा फुटबॉल असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय आंतर जिल्हा महिला खुल्या गटातील फुटबॉल स्पर्धेचे आयोजन येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. उद्या (दि.२४) या स्पर्धेचा अंतिम सामना सकाळी ८.३० वाजता खेळला जाणार असून हा सामना बुलढाणा विरुद्ध पुणे या संघांमध्ये होणार आहे.

 

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे लागले आहे कारण प्रथमच मुंबई व नागपूर हे दोन्ही संघ यंदा अंतिम सामन्यासाठी पात्र ठरलेले नाहीत. हा सामना संपताच पारितोषिक वितरण समारंभ होणार असून यासाठी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे खजिनदार प्यारेलाल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

उपांत्य फेरीचा निकाल:- रविवारी (दि.२३) पहिला उपांत्य फेरीचा सामना कोल्हापूर विरुद्ध पुणे यात खेळला गेला निर्धारित वेळेत कोणताही संघ गोल करू शकला नाही म्हणून टाय ब्रेकर देण्यात आला त्यात पुणे संघाने ३-० कोल्हापूरचा पराभव केला. यात उत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक श्वेता बोरुडे (पुणे) हिला देण्यात आले. त्याचप्रमाणे पुण्याची गोलकीपर अंजली हिचे विशेष कौतुक करण्यात आले.

दुसरा सामना बुलढाणा विरुद्ध गोंदिया याच्यात झाला, त्यातसुद्धा निर्धारित वेळेत कोणताही संघ गोल करू न शकल्याने टायब्रेकर देण्यात आला. टायब्रेकरमध्ये दोघी संघांनी तीन-तीन गोल केले म्हणून सडन डेथवर सामन्याचा निर्णय देण्यात आला आणि त्यात बुलढाणा संघाने गोंदियाचा ३-२ ने पराभव केला.
या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू गोंदियाची ऐश्वर्या बुंदे ठरली तर उत्तेजनार्थ बक्षीस भंडाऱ्याची ऐश्वर्या बोंडे हिने प्राप्त केले. त्याचप्रमाणे गोंदियाची खेळाडू दिपसिका हिवाळे हिने अंतिम गोल केल्याने तिचासुद्धा विशेष सत्कार करण्यात आला.

Protected Content