अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार; एकाला अटक

जळगाव प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरूणाला धरणगाव पोलीसांनी गुरूवारी १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी अटक केली. आज शुक्रवारी १५ ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्या. डी.एन.खडसे यांनी पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय मुलगी आपल्या आईवडीलांसह राहते. गावातील संशयित आरोपी तुकाराम माधव बेलदार (वय-२०) याने १७ वर्षीय मुलीला फूस लावून ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता पळवून नेत नाशिक येथे नातेवाईकांकडे थांबले. तिथे पिडीत मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी गावातील सरपंच यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुरूवारी १४ ऑक्टोबर रोजी तरूणीची वैद्यकीय तपासणी करून कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले तर संशयित आरोपी तुकाराम बेलदार या तरूणाला अटक धरणगाव पोलीसांनी सायंकाळी ४ वाजता अटक केली. आज शुक्रवार १५ ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्या. डी.एन.खडसे यांनी पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास धरणगा पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content