गावठी दारू विक्री करणाऱ्या दोन महिलावर कारवाई

शहर पोलीसांची कारवाई;  १ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवाजी नगर, हुडको भागात बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दोन महिलांवर शहर पोलीसांनी छापा टाकला. या कारवाईत दोघांकडून १ हजार ८०० रूपये किंमतीची दारू हस्तगत केली असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, “शिवाजी नगर हुडको परिसरात बेकायदेशीर दोन महिला गावठी हातभट्टी दारूची विक्री करत असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना मिळाली.

त्यानुसार पोहेकॉ विजय निकुंभ, पोहेकॉ उमेश भांडारकर, प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, गजानन बडगुजर, पोकॉ रतन गिते, महिला पोलीस कॉन्स्टेबल शिल्पा राठोड, तेजस मराठे, भास्क ठाकरे,  योगेश इंधाटे यांनी शुक्रवार २४ जून रोजी सायंकाळ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास छापा टाकला.

या कारवाईत पोलीसांनी गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दोन्ही महिलांकडून १ हजार ८०० रूपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली आहे.” याप्रकरणी पोलीस नाईक राजकुमार चव्हाण यांच्या फिर्यादीवरून संध्या विजय डाके (वय-३८) आणि मिना रविंद्र जगताप दोन्ही राहणार शिवाजी नगर हुडको, जळगाव यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!