रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना दिला पाठिंबा

भडगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे पदाधिकारी यांनी शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आपल्या रक्ताने पत्र लिहुन पाठीबा दर्शविला आहे. या अनोख्या आदोंलनामुळे संपुर्ण तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे.

शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी तालुक्यातील निष्ठावान शिवसैनिक आज शासकीय विश्रामगृह आवारात एकत्र होते. या ठीकाणीहुन छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यत रॅली काढुन पांठिबा देण्यात आला. या ठिकाणी विविध घोषणा देण्यात आला.

यावेळी युवासेना जिल्हा सरचिटणीस लखिचंद पाटील, निलेश पटील, रघुनंदन पाटील यांनी आपल्या रक्ताने लिखाण करत शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठीबा दिला. यात ते म्हणाले की, सन्मानीय उध्दवसाहेब आम्ही, तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही फक्त लढा, आम्ही आमच्या स्वतःच्या रक्ताने पत्र लिहुन रक्त बलिदान करीत आहोत. आम्ही सर्व शिवसैनिक आपल्या सोबत असुन हे रक्ताने लिहलेले पत्र हाच आमचा पाठींबा समजावा असे पत्रात म्हटले आहे.

यावेळी युवा सेनेचे जिल्हा सरचिटणीस लखिचंद पाटील, उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, जिल्हा समन्वयक अनिल पाटील, माजी नगरसेवक शंकर मारवाडी, युवा सेनेचे शहरप्रमुख बंटी सोनार, माधव जगताप, चेतन भोई, बाबाजी पाटील, आबा महाले भोरटेक, गणेश परदेशी, जे के पाटील, प्रशांत गालफाडे, पप्पू पाटील, भोला पाटील, महिला आघाडीच्या पुष्पाबाई परदेशी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content