भुसावळात उबाठाचे नगरपरिषेच्या विरोधात मटके फोडून आंदोलन

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भुसावळ शहरात विविध समस्यांमुळे नागरीकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे भुसावळ नगरपरिषदेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. या अनुषंगान उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने रस्त्यांचे खांबावर कंदील लावून व खड्ड्यांचे पूजन करून भुसावळ वॉटर सप्लाय मध्ये मटके फोडत अनोखे आंदोलन करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे नगरपालिकेच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाले असून शहरातील विविध समस्यांचा विरोधात दीपक धांडे शहर प्रमुख यांच्या नेतृत्वात अनोखे आंदोलन करण्यात आले. भुसावळ शहरात रस्त्यावरील खड्डे, रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद, अनियमित आणि अशुद्ध पाणीपुरवठा या समस्या संदर्भांत वारंवार निवेदने देऊन देखील प्रशासनाला जाग येत नसल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फ़े शहरात निषेध मोटर सायकल रॅली काढत काळे फुगे हवेत सोडून निषेध करण्यात आला तसेच रस्त्यावरील खड्ड्यांचे पूजन, स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे कंदील लावून शहराच्या पाणी पुरवठा विभागाच्या द्वारासमोर  मटके फोडत अनोखे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन या समस्या तात्काळ सोडवून यावर उपाययोजना करा, नाहीतर यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. नगरपालिकाचे आवारात एक तास ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला.

Protected Content