Home क्राईम बेपत्ता झालेल्या प्रौढाचा गिरणा नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ

बेपत्ता झालेल्या प्रौढाचा गिरणा नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ

0
107

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावखेडा शिवारातील जलराम नगरातून बेपत्ता झालेल्या ४३ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा गिरणा नदीच्या पत्रात मृतदेह आढळून आल्याची घटना गुरूवारी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष रामधन पाटील (वय-४५) रा. जलाराम नगर, सावखेडा शिवार, जळगाव असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारातील जलराम नगरात संतो पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने मानसिकस्थीती बरोबर नव्हते. यातच बुधवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाले होते. याबाबत जळगाव तालुका पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद देखील करण्यात आली होती. त्यांना शोधण्याचे काम सुरू असतांना गुरूवारी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७  वाजता गिरणा नदी पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ अनिल मोरे करीत आहे.


Protected Content

Play sound