जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला मारहाण; पहूर पोलीसात एकावर गुन्हा दाखल

पहूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मागील भांडणाच्या कारणावरून एकाने तरूणाच्या डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

पहूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कैलास राऊत (वय-२४) रा. शिवाजी नगर वाकोद ता. जामनेर हा कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. मागील भांडणाच्या कारणावरून १३ फेब्रुवारी रोजी गावात राहणारा गणेश प्रकाश भोसले याने शिवीगाळ करून हातात असलेला दगड डोक्याला मारला. यात सागर हा जखमी झाला. त्याला तातडीन जामनेर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात सोगर राऊत याच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गणेश राऊत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुभाष पाटील करीत आहे.

 

Protected Content