सावधान ! व्हॉट्सअॅप गृपवर अॅड करण्याआधी घ्यावी लागणार परवानगी


नवीदिल्ली (वृत्तसंस्था) १३० कोटी ग्राहकांसह व्हॉट्सअॅप आजच्या घडीला जगातील सर्वाधिक पसंतीस उतरलेले इन्सटंट मेसेजिंग अॅप म्हणून गणले जाते. यात २० कोटी भारतीयांचा समावेश आहे. व्हॉट्सअॅपची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अधिकाधिक चांगली सेवा देता यावी म्हणून हे सतत नवनवीन अपडेट्स देत असते. लाँच झाल्यापासूनच व्हॉट्सअॅपने अनेक नवे फीचर्स दिले आहेत. या फीचर्समुळेच ते पूर्वीपेक्षा अधिक उत्तम आणि सुरक्षित झाले आहे. एवढेच नव्हे तर व्हॉट्सअॅप येणाऱ्या काळात आपल्या अॅपमध्ये नवीन फीचर्स अॅड करण्याच्या तयारीत आहे. लवकरच नव्या फीचर्सचा यात समावेश होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशाच नवीन येणाऱ्या फीचर्सबाबत जाणून घेऊया.

व्हॉट्सअॅप बिटा इन्फोनुसार व्हॉट्सअॅप ग्रुप इन्व्हिटेशन फीचरवर आता काम सुरू आहे आणि पुढील काळात येणाऱ्या अपडेट्ससह हे फीचर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हे फीचर आल्यानंतर एखाद्याला ग्रुपमध्ये अॅड करण्यासाठी त्याची परवानगी घ्यावी लागणार आहे. हे फीचर आल्यानंतर ग्राहक त्या व्यक्तीचे स्टेटस सर्वात आधी पाहू शकतील, जे त्याच्याशी अधिक प्रमाणात चर्चा करतात. आता व्हॉट्सअॅप स्टेटस शेअर करताना ते वर-खाली होत राहते. व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच हे फीचर समाविष्ट होण्याची शक्यता आहे. ऑडियो पिकरमध्ये सुधारणेसोबतच येणाऱ्या या फीचरनंतर ग्राहकाला कोणतीही ऑडिओ फाइल पाठविण्यापूर्वी ते ऐकण्याची सोय उपलब्ध होणार आहे. यासोबतच हे फीचर आल्यानंतर ग्राहक एकाचवेळी ३० ऑडिओ फाइल्स पाठवू शकतील.

Add Comment

Protected Content