शेतकरी दाम्पत्यावर पोलिसांचा अमानुष लाठीमार

शेअर करा !

गुना वृत्तसंस्था । अतिक्रमण काढण्याच्या वादातून गुना जिल्ह्यातील एका शेतकरी दाम्पत्यावर मध्यप्रदेश पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

store advt

मध्य प्रदेशातील गुना येथे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी शेतकरी कुटुंबाला लाठीकाठीने बेदम मारहाण केली. यानंतर या शेतकरी दाम्पत्यांनी किटनाशक औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना मंगळवारी घडल्यानंतर याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हा व्हिडीओ ट्विट करून राज्य सरकारवर आरोप केले. एका दलीत शेतकरी कुटुंबावर पोलीस अत्याचार करत असून हे जंगल राज असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुनाचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना तात्काळ पदावरुन हटवून संबंधित घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. भोपाळमधील तपास यंत्रणा घटनास्थळी जाऊन संपूर्ण तपास करेल. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

खाली पहा कमलनाथ यांनी ट्विट केलेला व्हिडीओ.

आम्हाला फॉलो करा
error: Content is protected !!