रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील केळी संदर्भात समस्यांचा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या समोर शेतकर्यांनी तक्रारींचा पाऊस पाडला. यावेळी प्रत्येक केळी उत्पादक शेतकर्यांकडून जिल्हाधिकारी यांनी समस्या समजवून घेत सोडवण्याचे आश्वासन दिले.
रावेर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकर्यांच्या समस्या सोडवण्यासाठी रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीत एक बैठक आयोजित केली होती या बैठकीला जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित शेतकर्यांनी केळीला पोषण आहार केळी सामावेश करावा; १२५० शेतकरी पिक विम्या पासुन वंचित असून त्यांचा प्रश्न मार्गी लावावा. केळीची वाहतूक समस्या केळी लिलाव पध्दत केळी कोल्ड स्टोरेज व केळी वॅगन समस्या केळी वरील सीएमव्ही रोग, रेल्वे भाडे मध्ये सबसीडी मिळावी, नैसर्गिक आपत्तित केळीचे होणारे नुकसान, केळीला फळाचा दर्जा मिळावा यासह अनेक समस्याचा तक्रारींचा पाऊस जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडला
यावेळी प्रांतधिकारी कैलास कडलक, तहसिलदार बंडू कापसे,मयूर कळसे, सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, संचालक पांडुरंग पाटील, मंदार पाटील, डॉ राजेंद्र पाटील, गणेश महाज,न जयेश कुयटे पितांबर पाटील प्रल्हाद पाटील योगिराज पाटील, शेतकरी विनोद पाटील, सुनिल कोंडे, जितु पाटील, निरुळ, तुषार मानकर आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.