वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला; वाहन सोडून चालक फरार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावाच्या फाट्याजवळील रोडने मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास विना परवाना वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर पोलीसांनी धडक कारवाई केली आहे. यावेळी वळूने भरलेले डंपर पोलीसांनी हस्तगत केले असून मंगळवारी ११ जुलै रोजी पहाटे साडेचार वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावाच्या जवळ असलेल्या फाट्या जवळून मध्यरात्री १ वाजता वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपाधीक्षक आप्पासो पवार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने रात्री मंगळवार ७ जुलै रोजी रात्री १ वाजता कारवाई करत विनापरवाना वाढू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले. यावेळी डंपर चालक हा डंपर सोडून पसार झाला होता. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी वाळूने भरलेले डंपर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात जमा केले आहे. या संदर्भात मंगळवार ११ जुलै रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गुलाब माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपरवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र पाटील करीत आहे.

Protected Content